भाजप सरकारच्या काळात जवान शहीद होण्याच्या प्रमाणात वाढ; चार वर्षांत राज्यातील तब्बल 55 जवान शहीद


सर्वाधिक जवान सातारा जिल्ह्यातील; माहिती अधिकारातून स्पष्ट 

बाळकुणाल अहिरे/अहमदनगर : शत्रुराष्ट्रांना सडेतोड उत्तर देण्याची भाषा करणार्‍या मोदी सरकारच्या कार्यकाळात सीमेवर होणार्‍या हल्ल्यात वाढ झाली असून, पाककडून शस्त्रसंधीचे वारंवार उल्लघंन होतांना दिसून येत आहे. मोदी सरकारकडून सर्जिकल स्ट्राईक करत, दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न चार वर्षांत एकदाच झाला, तर शत्रुराष्ट्रांकडून नेहमीच भारतावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाल्याचे अनेक वेळेस दिसून आले. मोदी सरकारच्या कार्यकाळात 2014 पासून ते 2018 पर्यंत राज्यातील 55 जवानांना देशसेवा करतांना वीरगती प्राप्त झाली. माहिती अधिकार कार्यकर्ते निखिल चनशेट्टी यांनी मागविलेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे. 

देशाचे संरक्षण करतांना शहीद झालेल्या जवानांत महाराष्ट्रातील योगदान वादातीत आहे. सर्वात जास्त जवान हे काश्मीरमधील हल्ल्यात शहीद झाले आहेत. काश्मीर हे प्राचीन भारतीय संस्कृतीचे माहेरघर मानले जाते. राजाहरी सिंह यांनी काश्मीरचे विलीनीकरण भारतात केले. मात्र, काश्मीरवर डोळा ठेऊन असलेल्या पाकिस्तानने काश्मीरमध्ये हस्तक्षेप केले आणि तेव्हापासून अशांतता काश्मीरच्या पाचवीला पुजली गेली. आजही काश्मीर अशांतच आहे. याचाच फायदा घेऊन दहशतवादी हल्ले करतांना आढळून येतात. मात्र भारतीय सीमा सुरक्षा दलातील जवान जीवाची पर्वा न करता या दहशतवाद्यांना यमसदनी पाठवण्यासाठी तत्पर असतात, यातच अनेक भारतीय जवान शहीद झाले आहेत. 

गेल्या 10 वर्षांत महाराष्ट्र राज्यातील 27 पेक्षा जास्तीचे विविध ऑपरेशनमध्ये 101 जवान वीर मरण येऊन शहीद झालेले आहेत. 10 वर्षांच्या कालावधीत राज्यातील सर्वाधिक वीर मरण पावलेले जवान हे सातारा जिल्ह्यातील (16 शहीद जवान) असून सर्वाधिक वीरमरण सन 2017 मध्ये 20 जवान शहीद झालेले आहेत. तसेच 51 वीर जवानांना अपगंत्व आलेले आहे. तरी शहीद झालेल्या जवानांची प्रति वर्ष सरासरी 10.10 टक्के इतके आहे. तर 11 पेक्षा जास्तीचे विविध ऑपरेशनमध्ये दहा वर्षांतील अपगंत्व पत्करलेल्या जवानांची सरासरी 46.24 टक्के इतकी आहे. 10 वर्षांच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील वीर मरण पावलेल्या पैकी 99 जवानांना अधिकृतपणणे शहीद दर्जा मिळालेला आहे. 10 वर्षांमध्ये 127 जवानांना शहीद दर्जा मिळालेला नाही. 10 वर्षांच्या कालावधीत राज्यातील जवानांना विविध 6 पदक मिळालेले आहेत. त्यापैकी मुंबई उपनगरात 2 जवानांना सेना पदक व किर्ती चक्र तसेच सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्ह्यातील शहीद जवानांना प्रत्येकी 1 सेना पदक मिळालेले आहेत. 

- 10 वर्षांत राज्यातील 101 जवान शहीद 
- 99 जवानांना अधिकृत शहीदांचा दर्जा 
- 2017 मध्ये 20 जवान शहीद 
- 51 वीर जवानांना अपगंत्व 
- अपगंत्व पत्करलेल्या जवानांची सरासरी 46.24 टक्के 
- 10 वर्षांत 6 जवानांचा पदक देऊन सन्मान 
- शहीद झालेले सर्वात जास्त (16 जवान) सातार्‍यातील

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget