पुरोहितसह अन्य 6 जणांवर आरोप निश्‍चित; मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरण : सर्व आरोपींवर दहशतवादाचा कट, हत्येची आरोपनिश्‍चिती


मुंबई : मालेगावमधील 2008 सालच्या बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने आरोपनिश्‍चिती केली. दहशतवादाचा कट रचणे, हत्या आणि अन्य कलमाअंतर्गत आरोपींवर आरोपनिश्‍चिती करण्यात आली. ‘एनआयए’च्या विशेष न्यायालयाने 2008 मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासिंहसह सात जणांवर मंगळवारी आरोप निश्‍चित केले आहेत. आयपीसी आणि युएपीए कायद्यातील कलमांनुसार दहशतवादी कृत्याचा तसेच खुनाचा आरोप निश्‍चित करण्यात आला आहे. येत्या 2 नोव्हेंबरला याप्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे. 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमधील मशिदीजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जण ठार तर शंभरहून अधिक लोक जखमी झाले होते. यापूर्वी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने बॉम्बस्फोटप्रकरणी आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित आणि इतरांच्या विरोधात कनिष्ठ न्यायालयाद्वारे निश्‍चित केलेल्या आरोपांवर स्थगिती आणण्यास नकार दिला होता.

प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी आणि सुधाकर चतुर्वेदी यांच्याविरोधात आरोप निश्‍चिती करण्यात आली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 नोव्हेंबर रोजी होणार आहे. आरोप निश्‍चितीस स्थगिती देण्याची कर्नल पुरोहितची विनंतीही न्यायालयाने फेटाळून लावली. सर्व आरोपींनी निर्दोष असल्याचा दावा न्यायाधीशांसमोर केला. 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव येथील मुस्लिम बहुल परिसरात बॉम्बस्फोट घडविण्यात आला होता. त्यात सहाजणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी हिंदू दहशतवाद्यांचा हात असल्याचे उघड झाल्यानंतर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि कर्नल प्रसाद पुरोहित यांना बॉम्बस्फोटाचा कट रचणे आणि त्याची अंमलबजावणी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. 10 वर्षे उलटल्यानंतर आता सर्व आरोपींविरोधात आरोपनिश्‍चिती करण्यात आली आहे. डिसेंबर 2017 मध्ये न्यायालयाने या सर्व आरोपींना अंशत: दिलासा देत त्यांना ‘मोक्का’ कायद्यातून मुक्त केले होते. मात्र, बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) खटला चालवला जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. पुरोहित याने ‘यूएपीए’नुसार खटला चालवण्यास मंजुरी देण्याच्या निर्णयालाच हायकोर्टात आव्हान दिले आहे.

अभिनव भारत संघटनेद्वारे कट रचण्याचा आरोप 

मालेगाव बाँबस्फोटप्रकरणी अखेर 7 जणांवर आरोप निश्‍चिती करण्यात आली आहे. यामध्ये लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी आणि सुधाकर चतुर्वेदी यांच्याविरोधात आरोप निश्‍चिती करण्यात आली. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने म्हटलं की, ‘या सर्व जणांवर अभिनव भारत संघटनेद्वारे दहशत पसरवण्यासाठी कट करणे आणि 29 सप्टेंबरला झालेल्या घटनेत समावेश असल्याचा आरोप आहे. हे कृत्य दहशतवादामध्ये येतं.’

शिक्षेसाठी 2 नोव्हेंबरपासून सुनावणी 


काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने या आरोपींना जामीन मंजूर करत दिलासा दिला होता. आता मुंबई हायकोर्टाने 7 जणांवर आरोप निश्‍चित केल्याने या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. आता या प्रकरणात आरोपींच्या शिक्षेसाठी 2 नोव्हेंबरपासून सुनावणी सुरू होणार आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबईतील विशेष एनआयए कोर्टाने 27 डिसेंबर 2017 रोजी आरोपनिश्‍चीती केली होती. परंतु, यातील प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह पाच आरोपींविरोधातील मोक्का हटवला होता.
पुरोहित आणि साध्वी यांच्यावर यूएपीए कलम 17, 20 आणि 13 हटवण्यात आले. तसेच कोर्टाने शिवनारायण कालसंग्रा आणि श्याम साहूसह सर्व आरोपींची सुटका केली.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget