Breaking News

अल्पवयीन मुलीचा स्वत:च्या घरावर डल्ला; 83 हजाराचा ऐवज लंपास


सातारा(प्रतिनिधी) : सातारा तालुक्यातील यवतेश्वर येथील घरातून अल्पवयीन मुलीने घरफोडी करुन सोन्याचे दागिने व रोख असा एकूण 83 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी सातारा तालुका पेालीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनीषा राजेंद्र पवार (वय 41, रा. यवतेश्वर, ता. सातारा) यांच्या घरात 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी राहत होती. तिने 29 सप्टेंबर रोजी दुपारी बारा ते पाचच्या दरम्यान घरातील कपाटातील 80 हजार रुपये किमतीचे चार तोळ्यांचे दागिने व तीन हजार रोख असा एकूण 83 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्याप ती मिळून न आल्याने मनीषा पवार यांनी काल सायंकाळी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.