Breaking News

अभिनेत्री तनुश्री दत्ताचा नित्रुडकरांनी केला जाहिर निषेध


माजलगाव(प्रतिनिधी):- गेल्या काही दिवसांपासून सिनेकलाकार नाना पाटेकर यांची बदनामी करणारे वक्तव्य करून, प्रसिद्धी मिळवण्यासाठी तनुश्री दत्ता या नटीने आटापिटा चालवला आहे. वास्तविक पाहता, नानाजींचे सिनेसृष्टीतील योगदान महाराष्ट्रासाठी मौलिक आहे. पु.ल.देशपांडे, बाबा आमटे, मेहताताई, अशा थोराचा सहवासात नानासाहेबांचा पिंड पोसलेला आहे. कला जोपासण्या सोबतच सामाजिक बांधिलकी जोपासणारे नाना पाटेकर अनेकांचे प्रेरणा स्तोत्र झाले आहे. तनुश्री दत्ताचे अक्षेपार्ह वक्तव्य हे निषेधार्ह असुन माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथिल ग्रामस्थांनी या नटीच्या बेताल वक्तव्याचा जाहिर निषेध नोंदवला आहे.
नित्रुड गावासाठी नाम फाउंडेशनचे कार्य त्यातून उभी राहिलेली जलसाक्षरतेची चळवळ, शिवारात पाण्याचा भूगर्भात वाढलेला जल संचय, हे कार्य महाराष्ट्रात अनेक गावांमध्ये या नाम फाऊंडेशन मुळे होते आहे.
आत्महत्या घडलेल्या कुटुंबासाठी नाना पाटेकर पाठीचा कणा झाले आहेत. अशा व्यक्तीसाठी आम्हाला कमालीचा आदर आसल्याचे नित्रुडकर सांगतात. नानांच्या कार्याशी तमाम महाराष्ट्राच्या भावना जोडलेल्या आहेत. या भावनेला ठेस पोंचवण्याचे काम तनुश्रीने केले असुन महाराष्ट्रातील जनता तिला माफ करणार नाहित. सुमार प्रसिध्दीसाठी नाना पाटेकरांचा उल्लेख निंदनीय आहे. आम्ही नित्रुडकर शेतकरी बांधव या वक्तव्याचा निषेध करत असल्याचे रामदीप डाके, सेवा सोसायटीचे अध्यक्ष दत्ता डाके, सरपंच दिपक बोरचाटे, राजा डाके, शरद बोरचाटे, ज्ञानेश्वर जाधव, डि.व्ही.डाके, सुभाष डाके, जनक तेलगड, कांतराव डाके, प्रविण पछाडे, ऍड.हाजी, शायक रज्जाकभाई, गोपाळराव कुलकर्णी, पत्रकार सुर्यकांत बडे व गावातील सर्व शेतकर्‍यांनी नाना पाटेकरांच्या विषयी होतअसलेल्या बदनामी कारक वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे.