Breaking News

सुलतानपूर मध्ये नऊ एकर ऊस जळून खाक


किट्टी आडगाव (प्रतिनिधी)- माजलगाव तालुक्यातील सुलतानपूर येथील तीन सख्या शेतकरी भावांचा नऊ एकर मधील ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाल्याची घटना दि.११ रोजी घडली. माजलगाव तालुक्यातील सुलतानपूर येथील शेतकरी दादासाहेब निंबाळकर, विलास निंबाळकर व बळीराम निंबाळकर या तीन भावांनी नऊ एकर मध्ये ऊसाची लागवड केली होती. पावसाचा कमी पणा असूनही पाटाच पाणी व विहिरीच्या पाण्यावर ऊस जोमात आला होता. परंतु दि.११ रोजी अचानक ४.३० वाजता शेतातून गेलेल्या तारीला शॉर्टसर्किट झाल्यामुळे ऊसाला मोठ्या प्रमाणात आग लागली. यामुळे संपूर्ण ऊस जळून खाक झाला. परिसरातील नागरिकांनी विजवण्याचा काठोकाठ प्रयत्न केला परंतु आग लवकर आटोक्यात न आल्यामुळे नऊ एकर ऊस पुर्ण पणे जळून खाक झाल्याची घटना घडली. जळालेल्या ऊसाचा पंचनामा करण्यासाठी सुलतानपूर चे तलाठी जाधव साहेब, महावितरणचे कार्यकारी अभियंते तलांडे साहेब, लाईनमेन आगे साहेब व गांजकर साहेब यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.