Breaking News

जिवाजी महाले यांना जयंती निमित्त अभिवादन


बीड,(प्रतिनिधी):- शिवरत्न वीर जिवाजी महाले यांची जयंती आहे. जयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन राष्ट्रवादीचे युवा नेते तथा जि.प.सदस्य संदिपभैय्या क्षीरसागर यांनी अभिवादन केले.यावेळी प्रकाश कानगावकर, संजय गुरव, सुरेश आसलेकर, काळे सर, गुलाब चव्हाण, राजु ताठे, अंकुश निर्मळ, अमर ढोणे, मुकेश शिवगण, रफीक बागवान, अमर विद्यागर, विठ्ठल घोडके, सुनिल दोडके, रमेश राऊत, दत्ता नलावडे, फारुक पटेल, अमर नाईकवाडे, अशफाक इनामदार, पिंटू पोकळे, रंजीत बनसोडे, किशोर शिंदे, दोडके सर, अभय बीडकर, सचिन काळे, झुंजार धांडे, उत्तरेश्वर सोनवणे, राधाकिसन म्हेत्रे यांची विशेष उपस्थिती होती.

मंगळवार दि.९ ऑक्टोंबर रोजी वीर जिवाजी महाले यांची जयंती आहे. जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ त्यांची प्रतिमा ठेवुन अभिवादन करण्यात आले. यावेळी बारा बलुतेदार संघटनेच्या पदाधिकार्यांसह शहरातील सामाजिक, राजकीय चळवळीतील काम करणार्या कार्यकर्त्यांची, पदाधिकार्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सुरुवातीला संदीपभैय्या क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वीर जिवाजी महाले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांचे बारा बलुतेदार संघटनेच्या वतीने आभार मानन्यात आले.