Breaking News

नाशिक-पुणे महामार्गावर दुभाजवर बस आदळली; सुदैवाने अनर्थ टळला; ५५ प्रवासी सुखरूप


।संगमनेर/प्रतिनिधी।

तालुक्यातील जावळेवस्ती येथील नाशिक-पुणे महार्गावर परिवहन मंडळाच्या बसला मागे टाकण्याच्या प्रयत्नात एक चार चाकी वाहनाने बसला मागून धडक दिली. त्यामुळे सदर बसचालकाचा वाहनावरील ताबा सुटून बस दुभाजकावर आदळली. या बसमध्ये ५५ प्रवासी प्रवास करीत होते. चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला आणि बसमधील ५५ प्रवासी सुखरूप वाचले. 

आज दि. १२ रोजी सकाळी दहाच्या सुमारास नवापूर आगाराची बस (क्र. एम. एच २० बी. एल ३२०१) पुण्याहून येत होती. येथील जावळेवस्ती येथे मागून भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात या बसला धडक दिली. यावेळी बस चालक विनोद सोनावणे यांनी बसवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र सदर बसदुभाजकावर आदळली. सुदैवाने या बसमधील ५५ जणांचा जीव वाचविण्यात चालकाला यश आले.