जायकवाडीचे पाणी पेटले; नंतर ठाण्यालाही पाणी देणार

जायकवाडी प्रश्‍नावरील याचिकेवर तत्काळ सुनावणी करण्यास उच्च न्यायालयाचा पुन्हा नकार
मुंबई - जायकवाडी प्रश्‍नावर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा नकार दिला आहे. नाशिकमधील याचिकाकर्त्यांनी गुरुवारी पुन्हा एकदा न्यायमूर्ती भूषण गवईंच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे विनंती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायालयाने त्यावर सुनावणी करण्यास नकार देत याचिकाकर्त्यांनी दिवाळीनंतर येण्यास सांगितले आहे. दरम्यान 24 ऑक्टोबरला झालेल्या सुनावणीत मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला होता. नाशिकच्या धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याविरोधात भाजपचे गोपाळ पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. समन्यायी पाणी वाटप धोरणाला आव्हान देत पाणी सोडण्याच्या निर्णयावर नाशिकचे म्हणणे एकूण न घेतल्याचा आरोप या याचिकेद्वारे करण्यात आला होता. मात्र, बुधवारी या प्रकरणास विरोध करणार्‍या याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. नियमानुसार मराठवाड्याला कायदेशीर अडथळा नसल्याचे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने याचिककर्त्यांना पुनर्विचार याचिका दाखल करावी किंवा हे प्रकरण घेऊन सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आहे. 
पाणीप्रश्‍नाला धक्कादायक वळण, जायकवाडीनंतर ठाण्यालाही पाणी देणार

नाशिक : राज्यात पाणीप्रश्‍नाला धक्कादायक वळण लागलं आहे. कारण आता जायकवाडीनंतर ठाण्यालाही पाणी देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. इगतपुरी तालुक्यातील भावली धरणाचं आवर्तन शहापूरला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातला सरकारी आदेशदेखील निघाला आहे.
खरं तर वैतरणा धरणातील पाणी ठाणे, मुंबईसाठी राखीव आहे. मात्र, यंदा भावली धरणातून शहापूरला पाणी आरक्षित करण्यात आलं आहे. पण हा आमच्या पाण्यावर दरोडा आहे असं म्हणत इगतपुरी काँग्रेस आमदार निर्मला गावीत यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.


उद्या (26 ऑक्टोबर ) इगतपुरी तालुक्यातील भावली धरणावर याविरोधात आंदोलन करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यात काँग्रेससोबत शिवसेनाही आंदोलनात सहभागी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. शहापूर तालुक्यातील 97 गावांसाठी पाणी आरक्षित करण्यात आलं आहे. हे आरक्षण रद्द करा या मागणीसह आता आंदोलक मैदानात उतरले आहेत. जायकवाडी प्रश्‍नावरील याचिकेवर तातडीनं सुनावणीस हायकोर्टाचा पुन्हा एकदा नकार दिला आहे. या सुनावणीला दुसर्‍यांदा हायकोर्टाने नकार दिला आहे. नाशिकच्या याचिकाकर्त्यांनी यासंदर्भात विनंती केली होती पण न्या. भूषण गवईंच्या खंडपीठानं याला नकार दिला आहे.
तर नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून मराठवाड्यासाठी 8.9 टीएमसी पाणी सोडण्याचे अधिकृत आदेश आल्यानंतर नगरच्या पाटबंधारे विभागाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. प्रशासकीय सोपस्कार झाल्यावर कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येणार आहे.


मंगळवार आणि बुधवारी सलग दोन दिवस जिल्हाधिकार्यांच्या उपस्थितीत बैठका घेण्यात आल्या. मात्र पाणी सोडण्याला शेतकर्यांचा तीव्र विरोध होत आहे. राहुरी इथे नगर मनमाड महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेय तर सोनई येथे शेतकरी क्रांतिकारी पक्षाची बैठक सुरू आहे.

या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवण्यावर चर्चा सुरू आहे. माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वात ठोस आंदोलन करण्यात येणार आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget