संतांची सेवा करता आली नाही तर निंदा तरी करू नकाबीड,(प्रतिनिधी) : माणसाच्या जीवनात बाह्यरंगापेक्षा त्याचे मन किती निर्मळ आहे याला महत्त्व असते.संत, मुनी, साध्वी एका मात्या-पित्याला सोडून हजारो मात्या-पित्याला आपले मानतात, त्यांना तुमच्याकडून कशाचीही अपेक्षा नसते.त्यामुळे व्रतस्थ जीवनातून इतरांना ज्ञान देणार्या संतांची सेवा करता आली नाही तरी किमान त्यांची निंदा करू नका असे आवाहन क्रांतिकारी वाणीचे जादूगर पू. श्री. स्नेहा श्रीजी म.सा. यांनी केले. बीड शहरातील जैन भवन येथे चातुर्मासानिमित आयोजित प्रवचनमालेत शनिवारी (दि.६) रोजी त्यांनी विचाररूपी पुष्प मांडले. याप्रसंगी पू. श्री. श्रुतप्रज्ञा श्रीजी म. सा., पू. चंद्रकला श्रीजी म.सा. यांची उपस्थिती होती. पू. श्री. स्नेहा श्रीजी म. सा. म्हणाल्या,जीवन हा शब्द तीन अक्षरांचा आहे. या जीवनात प्रेम या अडीच अक्षरांचा अंगीकार करून प्रत्येकाने इतरांसाठी जीवन जगले तर जीवनाची सफलता प्राप्त होईल. जीवनात प्रेम, आपलेपणा याला खूप महत्त्व आहे. व्यक्ती जीवनात श्वासाला जितके महत्त्व आहे तितकेच महत्व विश्वासाला असते. सुंदर शरिरासह मनही तितकेच सुंदर बनवा. श्रद्धावान व्हा, चांगले संकल्प करा, जन्म - मरणाचा फेरा चुकवण्यासाठी मिळालेल्या या जीवनात खूप चांगले कर्म करा , तुमच्या चांगल्या कर्मातूनच मोक्षप्राप्तीचा मार्ग सापडत असतो. त्या म्हणाल्या, आपण घरात स्वयंपाक तयार करतो त्या ठिकाणाला किचन म्हणतो पण खरा समर्पक शब्द रसोईघर हा आहे. जिथे नेहमी किच किच, तू तू- मी- मी होते ते किचन असते तर ज्या ठिकाणी प्रेम, आपुलकी, जिव्हाळाचा रस असतो ते रसोईघर असते. संत- साध्वींची कधीही निंदा करू नका,त्यांना तुमच्याकडून काहीच हवे नसते तर तुमच्याच जीवनात ज्ञानाचा प्रकाश पाडण्याचे कार्य ते करत असतात असेही त्यांनी नमूद केले. यावेळी जैन समाज बांधव- भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.बीडकरांचे प्रेम जन्मभर लक्षात राहिल प्रवचनादरम्यान पू. स्नेहाश्रीजी म.सा.यांनी बीडकरांचे आभार मानले.या चातुर्मासात बीडकरांनी खूप प्रेम दिले. म्हणूनच आपल्या सर्वांशी प्रेम, आपुलकीचे नाते निर्माण झाले. आता चातुर्मास संपवून जाताना आम्ही येथून रिकाम्या हाताने जाणार नाहीत,कारण आपल्या सर्वांच्या प्रेमाची शिदोरी आम्ही सोबत घेऊन जाणार आहोत. आता तर असे वाटते की, आमचा जन्मच बीडच्या भूमीत झाला, इतका सुंदर प्रतिसाद आपण सार्यांनी दिला असेही त्यांनी सांगितले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget