Breaking News

‘त्या’ माजी पदाधिकाऱ्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार

जामखेड प्रतिनिधी 

येथील मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानसाठी बक्षीसरूपाने दान दिलेल्या जागेच्या कागदपत्रात फेरफार करून सदर मिळकतीवर ट्रस्ट नोंदणी करून स्वत:च्या फायद्यासाठी ऊर्दू शाळा सुरु असल्याचे दाखविल्याप्रकरणी पंचायत समितीच्या एका माजी पदाधिकार्‍याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याअनुषंगाने जामखेड न्यायालयाने या प्रकरणातील दोषींविरोधात समन्स जारी केले आहेत. 

यासंदर्भात न्यायालयीन लढाई सुरु आहे. सलीम शेख यांनी जानेवारी २०१८ मध्ये याप्रकरणी जामखेड कोर्टात तक्रार दाखल केली आहे. या तक्रार अर्जात खर्डा येथील कब्रस्तानच्या जागेची नोंद सातबारा उताऱ्यावरून गायब केल्याचे म्हटले आहे. तत्कालीन तलाठी मंडल अधिकारी यांना हाताशी धरुन खर्डा कब्रस्तानची नोंद गायब करण्याचा प्रकार केला गेला आहे. कब्रस्तान जागेवर ट्रस्ट स्थापन करुन आजीव ट्रस्टी शमशोद्दीन इमाम बागवान यांची कोऱ्या कागदावर सही घेऊन राजीनामा दिल्याचे दाखविण्यात आले आहे. तसेच त्यांचे नाव कमी केले असल्याचा आरोप शेख सलीम यांनी केला आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी कर्जत यांच्याकडे शेख यांनी अपिल केले होते. त्याचा निकाल सलीम शेख यांच्या बाजुने लागला आहे.