Breaking News

तर ईव्हिएम मशीनवर बंदी आणली असती-अर्थतज्ञ अच्युत गोडबोलेबुलडाणा,(प्रतिनिधी): ईव्हीएम मशील हॅक करणे अशक्य नाही, अमेरिकेमध्ये ते परवा सिध्दही करण्यात आले भारतात ईव्हीएम मशीनवरून सध्या गदारोळ सुरु आहे. मी जर निवडणूक आयुक्त असतो आणि ईव्हीएम बाबत थोडीही शंका उत्पन्न झाली असती तर निकोप आणि पारदर्शक निवडणुकांच्या दृष्टीने मी मशीनवर बंदी आणली असती असे मत असे मत आंतराष्ट्रीय अर्थतज्ञ, साहित्यीक तसेच प्रख्यात व्याख्याते अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केले. 

बुलडाणा येथे व्याख्यानानिमित्त गोडबोले बुलडाणा येथे आले असता कार्यक्रमापूर्वी ते पत्रकारांशी वार्तालाप करीत होते. संगणकावर 700 ते 800 पानाचे चार ग्रंथ लेखन तसेच स्वॉप्टवेर क्षेत्रातील भारत, इंग्लड, अमेरिका येथील आंतरराष्ट्रीय कंपन्यामध्ये 32 वर्षाचा प्रदिर्घ अनुभव असल्यामुळे पत्रकारांनी गोडबोलेंना ईव्हीएम बाबत छेडले असता ते म्हणाले की भाजप विरोधकांना समर्थन किंवा कोठलेही बटन दाबले की, ते कमळाला पडते अशा काही आरोपांमुळे मी ईव्हीएम मशीन खराब आहे असे म्हनणार नाही. ती हॅक करणे सहज शक्य नाही पण, शंका उत्पन्न झाली तर त्यावर निर्णय घेणे आवश्यक आहे असेहि ते म्हणाले. गोडबोले म्हणाले की, विवेकवाद आणि वैचारीक दृष्टीकोण सोडू नये, असे आवाहन करताना त्यांनी आयुर्वेदातील प्रचंड ज्ञानसंपदेचा उल्लेख केला. हजारो वर्षाच्या संशोधनानंतर मिळालेल्या औषधीचे पेटंट आपल्याला राखता आले नाही. ही शोकांतीका आहे. अमेरिका त्याच आयुर्वेदाच्या आधारावर औषधी विकसीत करते आणि पेटंट घेते. या बाबत आपण का एखादी मोठी प्रयोग शाळा विकसीत करीत नाही असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. शास्त्रज्ञ, संशोधक, डॉक्टर्स यांना आयुर्वेदाच्या अभ्यासासाठी वेगळी यंत्रणा तयार करीत नाही. यावेळी त्यांच्या सोबत ठाणेदार यु. के. जाधव, साहित्यीक नरेंद्र लांजेवार उपस्थित होते.