कोळपेवाडी दरोड्यातील आरोपींचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला; सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेने अनर्थ टळला


कोपरगाव प्रतिनिधी

कोळपेवाडी दरोड़यात अटक करण्यात आलेल्या आरोपींसह अन्य आरोपी आज, दि. १४ पहाटे ४ वाजण्यार्वी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र सुरक्षा रक्षकाच्या ही बाब लक्षात आली. त्यामुळे या कारागृहातील आरोपींचा शौचालयाचे भांडे फोडून पळून जाण्याचा प्रयत्न फसला. ही माहिती समजताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळास भेट दिली. 

येथील तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या कारागृहात ६९ कैदी आहेत. एकूण ५ खोल्या असून त्यापैकी ३ न्यायालयीन, २ पोलिस कस्टडी आणि १ महिलांसाठी आहे. कोळपेवाडी येथील लक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा टाकून दुकान मालक शाम सुभाष घाडगे व गणेश सुभाष घाडगे यांच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडल्या होत्या. यात शाम घाडगे मयत झाले होते. गणेश हे जखमी होते. यावेळी दरोडेखोरांनी सोन्याची लटू करून पलायन केले होते. याप्रकरणी तपासाची चक्रे फिरवत पपड्या गँगमधील आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले होते. त्यातील आरोपींना कोपरगाव येथील दूय्यम कारगृहात ठेवण्यात आले होते. मात्र शनिवारी रात्री आणि रविवारी पहाटेच्यादरम्यान सुंदरलाल रोहिदास भोसले, जितू रामदास भोसले, किरण बंडू काळे, शुभम पापड्या काळे, किशोर ऊर्फ क्रांती कांतीलाल भोसले, रविंद्र भाऊसाहेब जेजुरकर, अमोल बाळासाहेब जाधव, अनिल रविंद्र बागुल, सिद्धार्थ अर्जुन तुपे, राहुल प्रकाश कुऱ्हाडे, हरीष रंगनाथ देसाई, जगन्नाथ काशिनाथ अबक, संतोष रमेश जगताप, आकाश चंदूसिंग परदेशी, विलास पुंजाराम कुसारे, रविंद्र दिलीप मेहेरे, प्रवीण गंगाधर पवार यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. या आरोपींनी स्टीलचे ताट, तुटलेले नेलकटर व तारेच्या सहाय्याने शौचालयाचे भांडे आणि भिंत कोरून पळून जाण्याचा प्रयत्न चालविला होता. मात्र त्यापूर्वीच सुरक्षा रक्षकाच्या हे सारे प्रयत्न लक्षात आले. याप्रकरणी वरील आरोपींविरुद्ध कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात संगनमाताने कट करून कायदेशीर रखवालीतून पळून जाण्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget