Breaking News

वन विभागामार्फत गॅस जोडणीसाठी अनुदान द्यावे रासप विदर्भ अध्यक्ष अनिल जगताप यांची मागणी


बुलडाणा,(प्रतिनिधी): जिल्ह्यात वन समिती मार्फत वाटप करण्यात आलेल्या गॅस जोडणीचे अनुदान त्वरित उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी यांचेकडे रासपचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष अनिल जगताप यांनी केली आहे. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, वनविभागामार्फत जी गावे जंगलात किंवा जंगलाशेजारी येतात. त्या गावात वन समिती स्थापन करून लाभार्थींना गॅस वाटप करण्यात आले आहेत. 

ज्याअर्थी पाच वर्षापासून ही योजना यशस्वीरीत्या चालविण्यात आले. यामध्ये पंचाहत्तर टक्के शासनाचे अनुदान असते व पंचवीस टक्के लाभार्थींना भरावयाचे असते. या योजनेमुळे इंधनासाठी गावातील कोणीही महिला नागरिक जंगलामधून इंधन आणत नाही. त्यामुळे जंगलाचे संवर्धन होते. वन विभागाच्या हद्दीतील गावातील महिला व नागरिक फिरकत नसल्यामुळे वन्य प्राणी सुद्धा त्रास देत नाही. परंतु, एक महिन्यापासून शासनाचे अनुदान ही समितीच्या खात्यात जमा झालेच नाही. त्यामुळे गावातील गॅस जोडणी लाभार्थींना अनुदान मिळालेच नाही व पूर्ण पैसे भरून गॅस परवडत नाही. त्यामुळे याची दखल वन विभागाने त्वरित घ्यावी,अशी मागणी निवेदनात अनिल जगताप यांनी केली आहे. निवेदन देताना सावळाचे सुरेश जगताप, सुंदरखेडचे दुर्गेश पाटील, तारापुरचे बाबुसिंग दयाळ,पलढगचे भगवान भुजबळ आदींची उपस्थिती होती.