Breaking News

धनगर आरक्षण; गेवराईला १२ ऑक्टोबर रोजी मेळावा


गेवराई, (प्रतिनिधी)- धनगर समाजाने शासन दरबारी वेळोवेळी आरक्षणासाठी पाठपुरावा करुनही शासन आरक्षणाबाबत उदासिन आहे. त्यामुळे आरक्षणाचा लढा आणखी तीव्र करण्यासाठी समस्त धनगर समाजाच्या वतीने १२ ऑक्टोबर रोजी गेवराई येथे जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. गेवराई येथे आयोजित पत्रकार परिषदेत धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने ही माहिती देण्यात आली. गेवराई शहरातील बाजार तळावर १२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता हा जिल्हास्तरीय मेळावा होणार आहे. धनगर समाजाला तातडीने एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे, या अनुषंगोन जिल्हा मेळाव्यात मार्गदर्शन केले जाणार आहे. या मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी धनगर समाजाचे नेते गोपिचंद पडळकर, सुरेश कांबळे व उत्तमराव जानकर हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जालिंदर पिसाळ, फुलचंद बोरकर, गणपत काकडेंनी दिली आहे.