कारला धक्का लागण्याने बसचालकाला मारहाण; पोलिसांनी केली आरोपीला अटक


राहुरी प्रतिनिधी

येथील बसस्थानकात इनोव्हा गाडीला एस. टी. बसचा धक्का लागला, असे म्हणत गौरव हापसेसह इतर दोन जणांनी एस. टी. बसचालक मधुकर खेडकर यांना शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी त्यांचे मारहाण, अपहरण आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. 

याप्रकरणी बसचालक मधुकर हरिदास खेडकर यांनी फिर्याद दिली. दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ च्या दरम्यान ते बस नाशिकहून बस क्र. एम. एच. ०७ सी ९१३६ घेऊन शनिशिंगणापूरकडे निघाले होते. सकाळी साडे अकरा वाजे दरम्यान सदर बस उभी असताना चालक मधुकर खेडकर हे कंट्रोल रूमला माहिती देऊन शनिशिंगणापूरकडे चालले होते. बस सुरु होताच बस मागे उभी असलेल्या इनोव्हा गाडीतून गौरव हापसे {रा. ब्राम्हणी, ता. राहुरी} हा खाली उतरला आणि बसचालक खेडकर यांना माझ्या गाडीला बसचा धक्का लागला, असे म्हणत शिवीगाळ व मारहाण केली. दरम्यान, याप्रकरणी राहुरी पोलिसांनी गौरव अशोक हापसे याला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ हे करीत आहत.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget