Breaking News

‘निवासी मूकबधीर’ विद्यालयातील विद्यार्थांना मिष्टान्न भोजन; जैन कॉन्फरन्स आणि कोठारी प्रतिष्ठानचा उपक्रम


जामखेड ता. प्रतिनिधी

येथील जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन आणि कोठारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने संजय कोठारी यांच्यामार्फत प. पू. प्रतिभाकुवरजी म. सा. तथा प. पू. सिध्दीसुधाजी म. सा. यांच्या वाढदिवसानिमित्त ब्रम्हनाथ सेवा प्रसार शिक्षण मंडळ, सेलू संचलित ‘निवासी मूकबधीर’ विद्यालयातील विद्यार्थांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रफुल्ल सोळंकी होते. प्रमुख पाहुणे म्हणून जैन श्रावक संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी, ललित बाफना, गणेश भळगट, प्रितम बोरा, नितीन सोळंकी, सुमित चाणोदिया, निलेश भंडारी, संजय बोरा, आनंद बाफना, राजेंद्र भुजबळ, मुख्याध्यापक नारायण वायभासे आदी उपस्थित होते

शाळेचे सचिन पंडीत, गणेश गर्जे, अनिल दहिफळे, चांगदेव कांबळे, कुफरान कुरेशी आदींनी यासाठी सहकार्य केले. यावेळी मोकाट गायींना चारा वाटप करण्यात आले.