Breaking News

आजी आजोबा मेळावा उत्साहात साजरा

धारूर (प्रतिनिधी)- श्री कृष्ण इंग्लिश स्कूल धारूर या शाळेत आजी आजोबा मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कल्याण काळे सर प्रमुख पाहुणे म्हणून बाबू आप्पा गुळवे ,सुखदेव तीबोले, बशीर इब्राहिम व श्रीमती कल्पना महामुनी हे प्रमुख अतिथी उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये आजी आजोबांनी आपल्या नातवा विषयी मनसोक्त भरभरून शाळेच्या सहशिक्षक का सोबत चर्चा केली. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ,मानसिक ,बौद्धिक क्षमतेचा विकास करण्यासाठी चर्चा करण्यात आली .या कार्यक्रमांमधून सर्व आजी-आजोबांनी शाळेच्या सर्व शिक्षकांचे व्यवस्थापनाचे व संस्थाचालकांचे मन भरून कौतुक केले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या सहशिक्षिका गुडेवार मॅडम यांनी केले .प्रास्ताविक शाळेच्या सहशिक्षिका लांब मॅडम यांनी केले .तसेच आभार प्रदर्शन दिक्कत मॅडम यांनी केले. हे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक वृंद ,वाहतूक कर्मचारी व शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री राठोड सर यांनी मेहनत घेतली.