Breaking News

माळी समाजातील नेत्यांने घेतली कुटुंबासह धम्म दीक्षा


आष्टी,(प्रतिनिधी): आष्टी येथील माळी समाजाचे नेते तथा बीड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंत भगवानराव धोंडे यांनी आपल्या कुटुंबासह बुध्द धम्माची दीक्षा घेतली आष्टी येथील संकल्प बुध्द विहारात ६२ व्या धम्म चक्र प्रवर्तन दिनी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून वसंत भगवानराव धोंडे यांनी हिंदु धर्माचा त्याग करून बुध्द धम्माची दीक्षा घेतली वसंत भगवानराव धोंडे त्यांच्या पत्नी सुवर्णा मुले साहिल व किर्श यांना २२ प्रतिक्षा धम्म दीक्षा देण्यात आली. 

बुध्द विचाराने मानवी जीवनात प्रगती होते. हनुमंत उपरे यांच्या प्रेरणेने चलो बुध्द धम्म की और या प्ररणेने प्रेरित होऊन व बुध्द धम्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आपण बुध्द धम्म स्विकारला आहे असे वसंत यांनी सांगितले. यावेळी वसंत धोंडे यांच्या हस्ते पंचशिल ध्वजारोहन करण्यात आले आष्टी येथील बौद्ध बांधवांनी वसंत धोंडे यांचे स्वागत केले वसंत धोंडे यांच्या धम्म दीक्षा कार्यक्रमाच्या वेळी वामनराव निकाळजे, महालिंग निकाळजे, रत्नाकांत निकाळजे, अशोक निकाळजे, सीआर शिंदे, एस एम काळे,गायकवाड,रमेश कांबळे आदिसह धम्म बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.