Breaking News

स्वाभिमानीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटार फेको


 आंदोलन सोयाबीन कापूस उत्पादक शेतकर्‍यासांठी यापूढे आक्रमक आंदोलन- राणा चंदन 

बुलडाणा,(प्रतिनिधी): सोयाबीन कापसाला हमीभाव देवून शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रूपये नुकसानभरपाई दयावी, 20 ऑक्टोंबर रोजी स्वाभिमानीच्या कार्यकर्ते व शेतकर्‍यावर दाखल केलेले गून्हे मागे घेण्यात यावे यासह शेतकर्‍यांच्या विविध मागण्यासाठी स्वाभिमानीचे पश्‍चिम विदर्भ प्रमुख राणा चंदन यांच्या नेतृत्वात आज 22 ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोयाबीनचे कुटार फेकून आंदोलन करण्यात आले. 20 ऑक्टोंबर रोजी विदर्भ मराठवाडयात स्वाभिमानीने ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केल्यानंतरही भाजप सरकारने या आंदोलनकाकडे दुर्लक्ष करीत शेतकर्‍यांच्या मागण्यांना हरताळ फासला या पूष्ठभुमिवर आज पुन्हा स्वाभिमानीने आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर सोयाबीनचे कुटार फेकून आंदोलन केले.
राणा चंद्रशेखर चंदन, शे. रफिक शे.करीम यांच्यासह स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोयाबीनचे कुटार फेकले. तसेच सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत सोयाबीन कापूस उत्पादकांना हेक्टरी 50 हजार रूपये नुकसान भरापाई दया, सोयाबीन कापसाला हमीभाव जाहीर करा तसेच विदर्भ मराठवाडयात दुष्काळ जाहीर करून 20 ऑक्टोंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या रास्ता रोको आंदोलनात स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह कार्यकर्ते व शेतकर्‍यांवर पोलिसांनी जे गुन्हे दाखल केले ते तातडीने मागे घ्यावे अशी मागणी केली. दरम्यान शेतकर्‍यांच्या हया मागण्या सरकारने त्वरीत मान्य् न केल्यास यापूढे सोयाबीन कापूस उत्पादकांच्या मागण्यासाठी स्वाभिमानी यापेक्षाही आक्रमक भुमिका घेत जिल्हाभर आंदोलन करेल असा इशारा राणा चंदन यांनी दिला. यावेळी शे. रफिक शे.करीम, पुरूषोत्त्म पालकर, हरीभाऊ उबरहंडे, बादशाह खान. चौधरी शेख, शे. उस्मान, जाबीर शेख्, शे. बबलु, शे. जुबेर, पप्पू चौधरी, अमिन खासाब यांच्यासह कार्यकेर्ते उपस्थित होते.