Breaking News

सुसंस्कृत विद्यार्थी घडविण्याची ताकत शिक्षकांमध्येच : बाबुराव पाचर्णे


शिरुर/प्रतिनिधी
जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या रांजणगाव गणपती ता.शिरुर येथील विद्याधाम प्रशालेचे मुख्याध्यापक सुभाष वेताळ यांचा हनुमान नगर मित्र मंडळाच्यावतीने शिरुर-हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आला. सुसंस्कृत विद्यार्थी घडविण्याची ताकत शिक्षकांमध्ये असुन घडलेला सुसंस्कृत विद्यार्थी म्हणजे शिक्षकाला मिळालेला खरा पुरस्कार आहे. असे यावेळी आमदार बाबुराव पाचर्णे यांनी व्यक्त केले.

हनुमान नगर मित्र मंडळाच्यावतीने रांजणगाव गणपती येथील मंगलमुर्ती विद्याधाम प्रशालेचे मुख्याध्यापक सुभाष वेताळ, संभाजी शेळके जिल्हास्तरीय, आर.एन.शेख,अशोक कर्डीले ,दादाभाऊ औटी ,सृष्टी औटी (गुणवंत विद्यार्थीनी) यांचा शिरुर-हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी शिरूर हवेलीचे आ. बाबुराव पाचर्णे,भाजपाचे जिल्हा संपर्क प्रमुख धर्मेंद्र खांडरे,नगरसेवक अभिजीत पाचर्णे,माजी नगरसेवक निलेश लटांबळे,कार्यक्रमाचे आयोजक व मंडळाचे आधारस्तंभ भाऊसाहेब हार्दे,मंडळाचे खजिनदार/सचिव प्रशांत पवार,डॉ.तुषार राऊत,परशुराम पाचर्णे तसेच मंडळाचे सदस्य व भाजपाचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.