Breaking News

बौद्ध महासभेच्या तालुकाध्यक्षपदी किशोर कांबळे


नगर ता प्रतिनिधी

बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये किशोर कांबळे यांची बौद्ध महासभेच्या नगर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी अमोल गायकवाड यांची निवड करण्यात आली. 

यावेळी राष्ट्रीय अध्यक्षा मिरा आंबेडकर, नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष भगवंत गायकवाड, सरचिटणीस राजेंद्र साळवे, जिल्हा सचिव प्रकाश कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी संतोष गायकवाड, नितीन साळवे, दिपक अमृत, सिद्धार्थ घोडके, धोंडिबा राक्षे, सोन्याबापू सूर्यवंशी, मिरा कांबळे, राजश्री साळवे आदींची निवड करण्यात आली.