Breaking News

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले


बीड, (प्रतिनिधी):- डोंगरकिन्ही येथील एका १७ वर्षीय तरुणीला अहमदनगर जिल्ह्यातील खरवडी येथील तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी अंमळनेर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असुन या घटनेचा तपास पोलिस करत आहे.

डोंगरकिन्ही येथील १७ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने तिला पळवून नेले आहे. या प्रकरणी तरुणीच्या वडिलांनी सदरील हकीकत अंमळनेर पोलिस ठाण्यात सांगितली. मुलगी घरी परत न आल्याने घरच्यानीं तिचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. मात्र ती कोठेच अढळून न आल्याने आणि तिला त्या तरुणाने पळवले असल्याची माहिती तरुणीच्या घरच्यांच्या हाती आली. त्यानंतर त्या तरुणीच्या वडिलांनी थेट अंमळनेर पोलिस ठाण्यात सदरील हकीकत सांगितली. यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील खरवडी येथील रहिवाशी असलेला प्रतिक दिलीप आष्टेकर याच्याविरुद्ध फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा अंमळनेर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. सदरील घटनेचा तपास पोउपनि.गवडे हे करीत आहेत.