Breaking News

पिंपरी निर्मळ शाळेत शताब्दी महोत्सव उत्साहात


राहता प्रतिनिधी

तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल पिंपरीनिर्मळ या रयत शिक्षण संस्थेच्या विद्यालयात संस्थेच्या स्थापनेच्या शताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. दि. ४ ते ११ या कालावधीमध्ये हा महोत्सव साजरा झाला. या महोत्सवाच्या निमित्ताने संस्थेने विविध उपक्रमांचे आयोजन केले होते.

महोत्सवाचे औचित्य साधून वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, गणित विज्ञान प्रदर्शन आणि भव्य चित्र रथाचे प्रदर्शन यांचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेचे बैलगाडीतून सुरुवातीची परिस्थिती आणि ट्रॅक्टरमधून संस्थेची आजच्या प्रगतीची परिस्थिती यांचे चित्रण करण्यात आले होते. या चित्ररथासाठी विद्यालयातील शिक्षक कुंदे, आयनर, गोडगे, वाघमारे, जोंधळे, मेढे, चिंधे, द्वारके, कदम आदी सेवकवर्गाने विशेष परिश्रम घेतले.