ब्राम्होस क्षेपणास्त्र प्रकल्पात हेरगिरी; पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या एजंटला अटक


एटीएसची कारवाई ; भारतीय लष्कराला मोठा धक्का 

नागपूर: ब्राम्होस युनिटमध्ये काम करणार्‍या एका शास्त्रज्ञाला हेरगिरीच्या संशयावरून महाराष्ट्र व उत्तर प्रदेश एटीसने पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या एजंटला अटक केली. वर्धा रोडवरील उज्वल नगर येथे मनोहर काळे यांच्या घरी तो भाड्याने राहत असल्याची माहिती समोर आली आहे. चौकशी अधिकार्‍यांसह निशांत अजुनही घरातच असल्याची माहिती आहे. या संशयित व्यक्तीचे नाव निशांत अग्रवाल असे असून तो नागपूर येथे डीआरडीओच्या अतिमहत्त्वाच्या ब्राह्मोस प्रकल्पात काम करत होता. सूत्रांच्या माहितीनुसार, अधिकृत गोपनीयता कायद्याखाली ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. निशांत अग्रवाल ब्राह्मोस क्षेपणास्त्राशी संबंधित चमूमध्ये काम करत होता. नागपूरच्या उज्ज्वल नगरमधील मनोहर काळे यांच्या घरी तो भाड्याने राहत होता. यापूर्वी तो डीआरडीओच्या हैदराबाद येथील विभागात कार्यरत होता. निशांतने येथील गुप्त माहिती आयएसआय आणि अमेरिकन गुप्तचर विभागाला पुरविल्याचा संशय गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍यांना आहे. सध्या त्याची कसून चौकशी सुरु असून लवकरच यासंबंधीची माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. निशांतला 2017 - 18 चा यंग सायंटिस्ट अ‍ॅवॉर्डने गौवरविण्यात आले होते. घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मिलिटरी इंटेलिजंस आणि उत्तर प्रदेश एटीएसने ही संयुक्त कारवाई केली आहे. 15 ते 20 अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. रविवारी रात्रीच हे पथक नागपुरात दाखल झाले होते. 

कोण आहे निशांत अग्रवाल? 
निशांत अग्रवाल मुळचा रुडकी, उत्तराखंडचा आहे. त्याला 2016-17 मध्ये ‘बेस्ट सायन्टिस्ट’चा पुरस्कार मिळाला होता. मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाल्यानंतर तो डीआरडीओमध्ये कार्यरत आहे. नागपुरमध्ये येण्याअगोदर निशांत हैदराबाद येथे कार्यरत होता. निशांत हा डिफेंस रिसर्च अ‍ॅण्ड डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशनमध्ये बुटीबोरी युनिटमध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. नागपूर पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. 4 महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले असल्याची माहिती आहे. गेल्या महिन्यात उत्तर प्रदेश एटीएसने नोएडामधून एका बीएसएफ जवानाला अटक केली होती. पाकिस्तानी गुप्तहेर संस्था आएसआयच्या एजंटला महत्वाची माहिती दिल्याचा आरोप या जवानावर आहे. उत्तराखंडचा रहिवासी असलेल्या एका व्यक्तीलादेखील पाकिस्तानी हेराला मदत केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget