मशीनचे झाकण लागल्याने कामगाराचा जागीच मृत्यू


कराड (प्रतिनिधी) : तालुका कराड गावच्या हद्दीत मुधाई डेअरीमधील उमेशकुमार हिंगूराम यादव या कामगाराला सोमवार, दि. 22 रोजी दुपारी मशीनचे झाकण लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, दूध डेअरीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. 

कराड तालुक्यातील नारायणवाडी गावच्या हद्दीत पाचवड फाटा येथे मुधाई दूध डेअरीमध्ये संकलित केलेल्या दुधावर प्रक्रिया केली जाते. तयार केलेले सुगंधी दूध विक्रीसाठी पाठवले जाते. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास डेअरीचे काम सुरू झाले. कामगारांनी संकलित झालेले दूध बाटल्यांमध्ये भरून प्रक्रिया करण्यासाठी मशीनमध्ये ठेवल्या. त्यानंतर त्या मशीनचे झाकण लावून कामगार महिला जेवण करण्यासाठी गेल्या. 

दरम्यान, मशीनवर काम करणार्‍या कामगाराने मशीनचे झाकण व्यवस्थित न लावता मशीन सुरू केली. मशीन विशिष्ट तापमानाला गेल्यानंतर मशिनमध्ये दाब वाढल्याने प्रचंड प्रेशर निर्माण होऊन मशीनचे झाकण जोरात उघडले. ते झाकण बाजूलाच उभा असलेल्या उमेशकुमार यादव याला लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी मशीनमध्ये निर्माण झालेल्या प्रेशरमुळे मशीन साधारणपणे दोन फूट बाजूला सरकली होती. सुपरवायझरने ही बाब डेअरी मालक व पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget