Breaking News

अमेरिकेचा भारताला कारवाईचा गर्भित इशारा


वॉशिंग्टन : अमेरिकेचा विरोध झुगारून भारताने रशियासोबत एस-400 करार केला. याकडे सार्‍या जगाचे लक्ष होते. अमेरिकेने हा करार होऊ नये, यासाठी लाख प्रयत्न केले होते. शिवाय, भारतावर निर्बंध घातले जातील, असेही स्पष्ट केले होते. याच पार्श्‍वभूमिवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा गर्भित इशारा बुधवारी दिला. व्हाईट हाऊसमधील ओवल कार्यालयात माध्यमांशी बोलताना ट्रम्प यांनी भारतावर कारवाई करण्याची भाषा वापरली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन मागील आठवड्यात भारत भेटीवर आले होते. संरक्षण सहकार्य, दळवळण, व्यापार आदी महत्त्वाच्या करारावर रशिया आणि भारत यांच्यात स्वाक्षर्‍या करण्यात आल्या होत्या. सर्वात महत्त्वाचा करार म्हणजे एस-400 क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी हा होता. काऊन्टरींग अमेरिकास् अ‍ॅडव्हरसराईज् थ्रू सँक्शन अ‍ॅक्ट या अमेरिकेच्या कायद्यान्वये भारतावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. आंतराष्ट्रीय स्तरावरील नाट्यमय घडामोडीनंतर भारताने अखेर रशियासोबत एस- 400 क्षेपणास्त्र करार केला आहे. अमिरेका, चीन आणि पाकिस्तानसह जगाचेही लक्ष या कराराकडे लागले होते. अखेर भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेला हा करार अस्तित्वात आला. यामुळे भारतीय लष्कराचे बळ वाढणार आहे