Breaking News

निर्भया पथकाने कारवाई; १४ मुलांना ताब्यात घेतले


माजलगाव, (प्रतिनिधी):- नवरात्रोत्सवात निर्भया पथकाने रोडरोमिओं विरुद्ध कारवाईचा फास आवळला आहे. काल दि.११ रोजी १४ मुलांना पथकाने ताब्यात घेतले होते. या सर्व मुलांना समज देवून सोडून देण्यात आले.
माजलगाव येथील पोलिस उपअधिक्षक भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त निर्भया पथकाकडून रोडरोमिओंवरील कारवाई सुरुच आहे. नवरात्र उत्सवात ठिकठिकाणी मुलांचे घोळके थांबतात. यातून छेडछाडीचे प्रकार वाढत असल्याने अशा मुलांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. पथकाने काल दि.११ रोजी १४ मुलांना ताब्यात घेऊन त्यांना समज देवून सोडून दिले. वडवणी, तेलगाव याठिकाणीही पथकाने भेटी दिल्या आहेत. पथकामध्ये पो.कॉ.ललित साळवे, रफिक निसूरवार, महिला पोलिस कर्मचारी एस.एस.चव्हाण आदिंचा सहभाग आहे.