Breaking News

खा. गांधींकडून सीसीटीव्ही प्रणालीसाठी मदतीचा हात


सोनई प्रतिनिधी 

येथील पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सोनई गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा उपक्रम स्थानिक युवकांनी हाती घेतला आहे. येत्या १४ ऑक्टोबरला या उपक्रमाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. दरम्यान, या उपक्रमासाठी नगर अर्बन बँकेच्या सोनई शाखेमार्फत चेअरमन खा. दिलीप गांधी यांनी बँकेचे व्हॉइस चेअरमन नवनीत सुरपुरिया यांच्यामार्फत दहा हजार रुपयांची मदत दिली. पो. नि. कैलास देशमाने यांच्याकडे या रकमेचा धनादेश सुपूर्त करण्यात आला.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र निंबाळकर, बंडू चंदेल, शकील बागवान, राजेंद्र चोपडा, महावीर चोपडा, रावसाहेब लांडे, अनिल खाडे, एकनाथ कुसळकर, सुभाष लुणिया, आनंद लुणिया, संतोष ढेरे, इलियास शेख, गणेश आगळे, कुमोद चंगेडिया, संतोष बंग, सुभाष लोया, अविनाश बनकर आदी उपस्थित होते. शाखाधिकारी तुवर यांनी आभार मानले.