Breaking News

यशाची शिखरे पादाक्रांत केल्याने मान-सन्मान : डॉ. कळमकर


राहाता । प्रतिनिधी

कर्मवीर अण्णांनी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन दिल्याने लाखो विद्यार्थी घडले. रयतमधून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी यशाची शिखरे पादाक्रांत केल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात मान-सन्मान मिळत असल्याचे प्रतिपादन डॉ. संजय कळमकर यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त ते बोलत होते. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हारच्या सरपंच रिना खर्डे होत्या. बाभळेश्वर दूध संघाचे सदस्य अनिल खर्डे, उपसरपंच ज्ञानेश्वर खर्डे, भगवतीपूरचे सरपंच रावसाहेब खर्डे, बाळासाहेब खर्डे, भास्कर खर्डे, पुरुषोत्तम हिरानंदानी, अण्णासाहेब साबळे, झडे सर, बाळासाहेब राऊत, भाऊसाहेब पेटकर, गंगाधर खर्डे, शाम दळे, सुरेश पानसरे, उपमुख्याध्यापक हरिचंद्र चौधरी, प्राचार्य साहेबराव गायकवाड आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलतांना डॉ. कळमकर म्हणाले, की व्हाटस्अॅप व फेसबुकमध्ये आजची तरुणाई इतकी व्यस्त झाली, की आई-वडिलांकडे लक्ष त्यांना द्यायला वेळ मिळेना. महापुरुषांच्या जयंती साजरी करण्यापेक्षा त्यांचे विचार आचरणात आणणे गरजेचे आहे. प्रास्ताविक शिक्षिका धनवटे आणि शिंदे यांनी केले. शिक्षिका थोरात यांनी आभार मानले. 

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या माजी मुख्याध्यापिका प्रभावती देशपांडे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना व्याजातून बक्षीस देण्यासाठी ५ लाख ठेव ठेवली आहे. याबद्दल श्रीमती देशपांडे यांचा डॉ. कळमकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.