Breaking News

बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार


बीड, (प्रतिनिधी):- एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. पिडीत मुलगी सात ते आठ महिन्याची गर्भवती झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड शहरातील शाहूनगर भागातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तेथीलच शिक्षणासाठी आलेल्या एका तरुणाने दि.३ एप्रिल २०१८ रोजी अतिप्रसंग केला. या प्रकारामुळे पिडीत मुलगी घाबरली होती. त्यामुळे तिने या बाबत कुटूंबियांना काहीच सांगितले नाही. मात्र आज ती सात ते आठ महिन्याची गर्भवती असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर याबाबत तिने कुटूंबियांना माहिती दिली. अखेर पिडीत तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरुन गेवराई तालुक्यातील सुशीतांडा येथील राहूल राठोड (वय २०) याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बलात्कार व फोस्कोतर्ंगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एपीआय पगार हे करीत आहेत.