Breaking News

आष्टी तालुक्यात मृतदेह आढळला; घातपाताचा संशय


आष्टी, (प्रतिनिधी):- एका ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह शिवारामध्ये काल सकाळी आढळुन आला. सदरील तरुणाचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसुन घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. दुपारी उशिरापर्यंत पोलिसात नोंद झालेली नव्हती. आष्टी तालुक्यातील शिवारामध्ये काल सकाळी अंदाजे ३० वर्ष वयाच्या तरुणाचा मृतदेह आढळून आला. गवतामध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली असुन सदरील तरुणाचा मृत्यू कधी व कशामुळे झाला? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. सदरील मयताचे नाव दिपक असल्याचे समजते. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आष्टीच्या रुग्णालयात आणण्यात आला होता. सदरील प्रकार घातपाताचा असण्याचा संशय देखील व्यक्त केला जात आहे