Breaking News

संगीत क्षेत्रातील दिग्गजांना ‘आशीर्वाद’ची सुरमयी आदरांजली


नगर । प्रतिनिधी -
हार्मोनियम वादक पद्मश्री पं. तुळशीदास बोरकर, प्रसिध्द व्होयोलीन वादक पद्मश्री पं. डी. के. दातार आणि सतार वादक पद्मविभूषण अन्नपूर्णा देवी हे भारतीय संगीतातील दिग्गज मागील महिन्यात स्वर्गवासी झाले. त्यांनी संगीत क्षेत्राला दिलेले अमूल्य योगदान रसिकांना कधीही विसरणे शक्य नाही.नगर शहरातील आशीर्वाद ग्रुपने या दिग्गजांना सूरमयी आदरांजली वाहिली.हा कार्यक्रम औदुंबर कॉलोनी सावेडी येथे पार पडला. यावेळी पवन नाईक, रेवणनाथ भनगडे, मधुकर चौधरी, विठ्ठल लोखंडे, सूर्यकांत पुंडे, कारभारी पठारे, आनंद कुलकर्णी, डॉ. रुपाली कुलकर्णी, अपर्णा बालते, रघुनाथ सातपुते, धनेश बोगावत, डेव्हिड चांदेकर आदींसह परिसरातील संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात शहरातील ज्येष्ठ हार्मोनियम वादक डॉ.मधुसूदन बोपर्डीकर यांनी राग मारुबिहाग तर व्हायोलीन वादक महेश लेले यांनी राग यमन, तसेच सतार वादक स्मिता राणा यांनी राग मधुवंती सादर केला. तीनही वाद्ये वाजवून एक अनोखी आदरांजली वाहिली. या वादकांना तबल्यावर साथ संगत प्रसाद सुवर्णपाठकी यांनी केली. आशीर्वादचे अध्यक्ष श्रीराम तांबोळी यांनी उपस्थितांना कलाकारांचा औपचारिक परिचय करून दिला. दोन मिनिट उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.