Breaking News

कुलकर्णी यांना वेदभूषण सन्मान


शिर्डी / प्रतिनिधी 

निघोज निमंगाव येथील घनश्याम किशोर कुलकर्णी (गुरु) यांना मानव संसाधन विकास मंत्रालयाअंतर्गत महर्षी सांदिपनी वैदविद्या प्रतिष्ठान यांच्यावतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळाला. त्यांना उज्जैन विद्यापीठाच्या वेदभूषण पदवीने सन्मानित करण्यात आले. या यशाबद्दल शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती महास्वामी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या परीक्षेसाठी ३ हजार विद्यार्थी बसले होते. आठ वर्षांचे कठोर शिक्षण वेद या विषयावर घेतले. यासाठी त्यांना वेदशास्त्री योगेश कुलकर्णी, रविंद्र पैठणे, गोविंद पैठणे आदींचे मार्गदर्शन लाभले.