Breaking News

नवरात्र देवी उपासनेचा मोठा उत्सव : डॉ. पवार

दहिगाव ने/ प्रतिनिधी 

नवरात्र उत्सव देवी उपासनेचा एक आनंददायी उत्सव आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात सहभागी होऊन या सार्वजनिक उत्साहाचा आनंद घ्यावा. कारण नवरात्र उत्सव देवी उपासनेचा मोठा उत्सव आहे, असे मत साई फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अरुण पवार यांनी व्यक्त केले.

शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथील तुळजाभवानी मंदीरात नवरात्र उत्सव निमित्त घटस्थापना करण्यात आली. येथील घटस्थापनेसाठी जयभवानी तरूण मंडळाने तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद येथील तुळजाभवानी माता मंदीरातून ज्योत आणून दहिगावने येथील ग्राम दैवत असलेल्या तुळजाभवानी मंदीरात मोठ्या उत्साहात घटस्थापना करण्यात आली. यावेळी गुलाब घुले यांच्या हस्ते आरती करण्यात आली. सरपंच सुभाष पवार, उपसरपंच राजाभाऊ पाऊलबुद्धे, सेवा सोसायटी उपाध्यक्ष बाळासाहेब मरकड, चंद्रकांत जोशी, गोरख लोनकर, बशिर पठाण, लक्ष्मण काशिद, विलास लोखंडे, प्रा. मच्छिंद्र पानकर, अदित्य वाघ आदींसह जयभवानी तरुण मंडळातील युवक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.