Breaking News

मुख्याध्यापिका म्हस्के आणि व शिक्षिका नाईक सेवानिवृत्त


नेवासा प्रतिनिधी

नेवासा खुर्दमधील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला म्हस्के आणि शिक्षिका शिला नाईक या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाल्या. सेवानिवृत्तीबद्दल त्यांचा नेवासा येथे झालेल्या कार्यक्रमात नुकताच सत्कार करण्यात आला.

नेवासाफाटा रोडवर असलेल्या लक्ष्मी मंगल कार्यालयात सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी दगडू तळपे, संचालक राजेंद्र मुंगसे, ज्ञानोदय इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक पंडीतराव खाटीक, आदर्श शिक्षिका शरदिनी देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर देशपांडे, नगरसेविका शालिनी सुखधान, शाळा व्यवस्थापन अध्यक्षा सारिका बल्लाळ, शिक्षिका श्रीमती काठमोरे, केंद्रप्रमुख शाम फंड, शिक्षक नेते गुरुमाऊलीचे रामेश्वर चोपडे, बापूसाहेब तांबे, नंदू पाथरकर, रविंद्र कडू, गुरुकुलचे जिल्हा पदाधिकारी भास्कर नरसाळे, संदीप जंगले, सदिच्छा मंडळाचे राजाभाऊ बेहळे, अविनाश भालेराव आदींसह विविध संस्थेचे पदाधिकारी आणि विविध शाळेतील शिक्षक नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद नेवासा खुर्द शाळेचे अध्यापक राहुल आठरे यांनी स्वागत केले. शिक्षकांच्या कार्याचा परिचय सुनीता कर्जुले-राऊत करून दिला. सुभाष चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी नेवासा खुर्द जिल्हा परिषदेच्या मुले शाळेच्या शिक्षिका छाया वाघमोडे, अश्विनी मोरे, प्रतिभा पालकर, मिनाक्षी लोळगे, प्रतिमा राठोड, प्रतिभा गाडेकर, विद्या खामकर अध्यापक साईनाथ वडते, अण्णासाहेब शिंदे, अरविंद घोडके आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.