मासेमाऱ्यांना सापडला ४५ किलोचा ‘कटला’


कर्जत : प्रतिनिधी

उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात मासेमारीसाठी गेलेल्या तीन मच्छिमारांना तब्बल ४२ किलो वजनाचा कटला मासा सापडला आहे. या जलाशयात अलीकडच्या काळात सापडलेला हा सर्वात मोठा कटला मासा आहे.

हा मासा बारामतीचे मासे व्यापारी शंकर मोरे यांनी १३० रुपये दराने खरेदी केला. ५ हजार ८५० रुपयांना खरेदी केला. भिगवण मासळी बाजारातील आडतदार भगवान महाडिक यांच्या आडतीवर आलेला हा मासा पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. उजणीत यापूर्वी ५० किलोपासून शंभर किलो वजनाचे कटला जातींचे मासे सापडत आहेत. मात्र अलीकडे सर्वच जातींच्या माशांचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे अलीकडच्या वीस वर्षांतील सर्वांत जास्त वजनाचा आजचा मासा ठरला आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget