Breaking News

काळे कारखान्याचे आज बॉयलर अग्निप्रदीपन

कोपरगाव / प्रतिनिधी 

येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा सन २०१८-१९ या वर्षाच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ उद्या दि. ११ सकाळी ९.३० वाजता होणार आहे. कारखान्याचे जेष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आ. अशोक काळे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे, संचालक सचिन चांदगुडे देवकी चांदगुडे यांच्या हस्ते होणार हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप यांनी दिली. या कार्यक्रमास सर्व सभासदांनी व कारखाना व उद्योग समुहावर प्रेम करणा-या हितचिंतकानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप व कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.