Breaking News

राहुल जगताप यांचा वाढदिवस शालेय साहित्य वाटप करून साजरा


माजलगाव (प्रतिनिधी)- तालुक्यातील देपेगाव येथे युवा नेते राहुलकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त अनआवश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्यात आला.देपेगाव वसाहत याठिकाणी जि.प.शाळा याठिकाणी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन कृष्णा आबुज, शुभम काळे यांनी केले होते.

यावेळी जेष्ठ नागरिक माणिकराव जामकर,भाऊराव काळे,रमेश पांचाळ,भुजंगराव देवडकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक जामकर,विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष हितेंद्र काळे,अशोक देवडकर,राहुल सिरसट,पांडुरंग इंगळे,गणेश देवडकर,भास्कर काळे,कृष्णा आबुज,सुरेश घुले,शुभम काळे,शाळेचे मुख्याध्यापक डोंगरे सर,सहशिक्षक जाधव सर,तालखेडकर,सिरसट मॅडम उपस्थित होते.