Breaking News

बौद्ध महासभेच्या कार्यकारिणीमध्ये २६ जणांना स्थान : खंडीझोड


राहाता. दि. प्रतिनिधी

भारतीय बौद्ध महासभेची राहाता तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. यामध्ये २६ पदाधिकाऱ्यांना स्थान देण्यात आले आहे. तालुकाध्यक्षपदी गौतम पगारे याची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष संजय खंडीझोड यांनी दिली.

भारतीय बौध्द महासभा संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मिरा आंबेडकर व राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी वाटचाल करीत असलेल्या या संस्थेच्या राहाता तालुक्याची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीमध्ये गौतम पगारे, विजय खंडीझोड, चंद्रशेखर ब्राम्हणे, सुरेश बनसोडे, संस्कार त्रिभुवन, वंदना इंगळे, बाळासाहेब शिरसाठ आदींचा समावेश आहे. 

कार्यकारिणीची निवड महाराष्ट्र राज्याध्यक्ष यु. जी. बोऱ्हाडे तसेच विभागीय संघटक अनिल गांगुर्डे, के. आर. पडवळ आणि महिला संघटक विशाखा निळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यानिमित्त पार पडलेल्या बैठकीचे सूत्रसंचालन गौतम पगारे यांनी केले. बैठकीच्या यशस्वीतेसाठी शिर्डी शहर शाखाअध्यक्ष शाहू शेजवळ , सुरेश शेजवळ, प्रदिप त्रिभुवन आदींनी विशेष प्रयत्न केले.