Breaking News

भव्य शैक्षणिक विद्यापीठ नगरमध्ये असावे हे माझे स्वप्न-सुनिल रामदासी


नगर - आपल्या सत्काराच्या उत्तरात श्री.रामदासी म्हणाले, ही निवड माझीएकट्याची नसून केलेल्या शैक्षणिक कार्याची आणि हिंद सेवा मंडळाच्यानावलौकिकाची आहे. नि:स्वार्थ काम करतांनाच शिक्षण क्षेत्रासाठी भव्य-दिव्य ध्येयमाझ्या समोर असून, पुणे विद्यापीठाच्या नगर विभागाचे काम कसे उत्कृष्टआणि लवकरच पूर्ण होईल. यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे. आलेल्या संधीचसोनं करण्याची जबाबदारी आपल्या सत्कारामुळे आणि शुभेच्छामुळे मिळते.नगरच्या विद्यार्थ्यांना भविष्यात आपल्या शैक्षणिक कामासाठी पुण्यातीलविद्यापीठ कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागणार नाही आणि पूर्ण क्षमतेनेविद्यापीठातील सर्वच विभाग नगरच्या उपविद्यापीठ कार्यालयात कसे येतील,यासाठी आपण विशेष प्रयत्न करणा आहोत. केवळ नगरवर प्रेम न करता नगरचाशैक्षणिक विकास करण्याची खरी संधी असून, विद्यापीठाने माझ्यावर दाखविलेलाहा विश्‍वास म्हणजेच हिंद सेवा मंडळाच्या प्रगतीचा गौरव आहे, असे प्रतिपादनहिंद सेवा मंडळाचे सचिव सुनिल रामदासी यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपपरिसर समिती सदस्यपदी निवडझाल्याबद्दल नुकताच सुनिल रामदासी यांचा सत्कार सीताराम सारडा विद्यालय वहिंद सेवा मंडळाच्या प्राथमिक शाळेच्यावतीने करण्यात आला. यावेळी अध्यक्षम्हणून ब्रीजलाल सारडा होते. याप्रसंगी प्रा.मकरंद खेर, मधूसूदन सारडा, अजितबोरा, संजय लोढा, लक्ष्मीनारायण सारडा, रविंद्र गुजराथी यांच्या हस्ते सुनिलरामदासी यांचा ‘शिक्षण क्षेत्रातील मानाचा तुरा’ उल्लेख असलेले स्मृतीचिन्ह, शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी आपल्या अध्यक्षी शुभेच्छा पर भाषणात ब्रिजलाल सारडा यांनीसुनिल रामदासी म्हणजे संधीचं सोनं करणारं नेतृत्व असून, शिक्षण क्षेत्रात मोठंस्थायी काम करण्याचं त्याचं उच्च ध्येय आहे. ते या निवडीनं नक्की साध्य होईल.आपल्या कार्य कर्तुत्वाने पुणे विद्यापीठाच्या या उपकेंद्राची नोंद इतिहासातरामदासी करतील. सर्वांशी उत्तम संबंध असणारे लोकहिताय कर्मयोगी म्हणूनशहर त्यांच्याकडे पाहत आहे. भविष्यातील त्यांचे कार्यच शिक्षण क्षेत्राला दिशादाखविल. कारण जे काम करायचे ते उत्तमच हा त्यांचा मूळ स्वभाव आहे.

यावेळी प्रा.मकरंद खेर यांनी आपल्या शुभेच्छामध्ये सुनिल रामदासी यांचीही निवड म्हणजे त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील मोठ्या स्थायी कामाची सुरुवात असून,आपल्या दूरदृष्टीने व कार्यशैलीने ते नक्कीच भव्य-दिव्य काम या क्षेत्रात करतीलआमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि नेहमी सहकार्य असेल हे आवर्जुन सांगितले.

प्राथमिक शाळेचे चेअरमन मधूसूदन सारडा यांनी शुभेच्छा देतांना सुनिलरामदासींची निवड म्हणजे हिंद सेवा मंडळाच्या विकास कार्याची योग्य दखलनगरच्या शैक्षणिक विकासात रामदासी नक्कीच भरीव असे कार्य करतील. यावेळीअजित बोरा यांनी मोलाच्या शुभेच्छा आपल्या भाषणातून दिल्या.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तविक पर्यवेक्षक मधुसूदन साबळे यांनी केले.ग्लोबल एक्सलन्सी हा जर्मनीचा अ‍ॅवॉर्ड मिळाल्याबद्दल सुरेश चव्हाण यांचेअभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमास शिक्षक प्रतिनिधी विठ्ठल ढगे, सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारीवृंद आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.शिक्षकांच्यावतीने विलास साठे, श्रीमती क्रांती मुंदानकर यांनी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र चोभे यांनी केेले तर आभार प्राथमिक शाळेचेमुख्याध्यापक विठ्ठल उरमुडे यांनी मानले.