Breaking News

शूरवीर जिवाजी महाले यांची९ ऑक्टोबरला गेवराईत जयंती


गेवराई,(प्रतिनिधी): गेवराई येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे शूर वीर अंगरक्षक जिवाजी महाले यांची ९ ऑक्टोबर २०१८ रोज मंगळवार रोजी गेवराई येथे जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे तरी गेवराई तालुक्यातील नाभिक बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उत्सव समितीचे अध्यक्ष नानासाहेब पंडित यांनी केले आहे.

सदर माहिती अशी की राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे शूरवीर अंगरक्षक जिवाजी महाले यांची जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक गेवराई येथे संत सेना महाराज मंदिर सावता नगर गेवराई येथून ही भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.