Breaking News

ग्रामसेवकाला जीवे मारण्याची धमकी;अंभोरा पोलीसात गुन्हा


आष्टी (प्रतिनिधी)- आमच्या अतिक्रमणाची नोंद रेकॉर्डला का घेत नाहीस असे म्हणत दोघा जणांनी आष्टी तालुक्यातील लोणी येथील ग्रामसेवकास शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत शासकीय कागदपत्रे फाडली. हि घटना सोमवारी सकाळी लोणीच्या ग्राम पंचायत कार्यालयात घडली.अरविंद किसन रासकर (रा. नगर अभियंता कॉलनी, अहमदनगर) हे मागील सहा वर्षापासून आष्टी तालुक्यातील लोणी येथे ग्रामसेवक पदावर कार्यरत आहेत. सोमवारी (दि. ८) सकाळी लोणी ग्राम पंचायत कार्यालयात दैनंदिन कामकाज सुरु असताना ९.५० वाजता गावातील बाबू भीमराज देवकर आणि बापूराव भीमराज देवकर हे दोघे तिथे आले. तू आमच्या अतिक्रमणाची नोंद रेकॉर्डला का घेत नाहीस असे म्हणत त्यांनी अरविंद रासकर यांच्यासोबत हुज्जत घालून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांनतर बाबू देवकर याने इमारती व जमीन आकारणीची यादी रजिस्टर मधील काही महत्वाची पाने फाडून टाकली. यावेळी रासकर यांना दमबाजी आणि शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. याप्रकरणी अरविंद रासकर यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींवर कलम ३५३, ५०४, ५०६, ३४ अन्वये अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.