Breaking News

पोलिस उपअधिक्षकांच्या हस्ते कराटेपटूंचा सत्कार संपन्नबीड, (प्रतिनिधी): औरंगाबाद येथे संपन्न झालेल्या ८ व्या खुल्या कराटे चॅम्पियन्समध्ये बीड येथील कराटेची मुहूर्त मेढ रचणारे सय्यद मुश्ताक (मुसा सर ब्लॅक बेल्ट ४ ऑन) व त्यांचे मुब्बलीग प्रायमरी शाळेचा विद्यार्थी मोहम्मद रय्यान एपी युसूफ याने रौप्यपदक पटकावले. याच्यासह खेळाडुंनी नेत्रदिपक कामगिरी करून २० पदके पटकावून जिल्ह्याला बेस्ट ट्रॉफी मिळवली. या सर्व कराटे खेळाडुचे पोलिस उपअधिक्षक सुधीर खिरडकर यांनी अभिनंदन करून मेडल देवून सत्कार केला. व खेळाडुंना मोलाचे मार्गदर्शन केले. या सोहळ्यामध्ये अनेकांनी आपली उपस्थिती दर्शवली. यात रफीक नाशाद, मॉडल स्कुलचे प्राचार्य कौसर मॅडम, ऍड. श्रीपाद तुपकर, चुन्नू भाई, पठाण मुजीब, कलीमभाई तसेच विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी खेळाडुंनी कराट्याचे चित्त थरारक प्रकार सादर केले.