Breaking News

हारूण सिध्दीकी यांचे शरीरसौष्टव स्पर्धेत यश


बीड, (प्रतिनिधी): इंडियन बॉडी बिल्डींग फेडरेशनतर्फेत आयोजित ५२ वी एशियन बॉडी बिल्डींग स्पर्धा पुणे येथे दिनांक ०२/१०/२०१८ ते १०/१०/२०१८ या कालावधीत पुणे पार पडलेल्या मी एशिया या स्पर्धेत बीडचे सिनिअर बॉडी बिल्डर हारूण सिध्दीकी भारतीय संघात निवड झाली व त्यांनी मी एशिया २०१८ या स्पर्धेत त्यांनी मास्टर (मी एशिया) ६० ते ६५ या वजनी गटात आपल्या पिळदार शरीर यष्टीचे उत्कृष्ट पोझींगद्वारे प्रदर्शन करून त्यांनी ६० ते ६५ या वजनदी गटात मी एशिया स्पर्धेत ४ था क्रमांक मिळवला. त्यांच्या वजनी गटात ३० राष्ट्रांच्या स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. 

सध्या तजे एस.टी. महामंडळात कार्यरत असून त्यांना विभागीय नियंत्रक स.वा.सुपेकर सर तसेच वाय.के. सानप, सय्यद शौकत, अब्दुल फैय्याज सिध्दीकी, शेळके यांनी मालाचे सहकार्य करून बीड विभागाचे (एस.टी. महामंडळ) तर्फे विभागीय नियंत्रक स.वा.सुपेकर सरांनी त्यांचा सत्कार केला