Breaking News

वीर जिवाजी महाले जयंतीनिमित्त उद्या विविध कार्यक्रमाचे आयोजन


सातारा, (प्रतिनिधी) : वीर जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त सोमवार, दि. 8 रोजी वीर जिवाजी नाभिक संघटना सातारा शहर व सातारा तालुका नाभिक संघटना व नाभिक रत्न चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

दि. 8 रोजी सकाळी 9 वाजता येथील तालीम संघ मैदानावर नाभिक समाजबांधव जमा होवून रथयात्रा व मिरवणुकीने राजपथ मार्गे राजवाडा ते शिवम मंगल कार्यालय कोटेश्वर मंदिराजवळ जाणार आहेत. यावेळी शूरवीर जिवा महाले शौर्य पुरस्कार नाभिक महाराष्ट्र माजी जिल्हाध्यक्ष आबासाहेब माने यांना देण्यात येणार आहे. तर शूरवीर रत्न शिवा काशिद स्वामीनिष्ठा पुरस्कार नाभिक रत्न चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष सुर्यकांत पानस्कर यांना देण्यात येणार आहे. त्याचबरोबर आदर्श माता पुरस्काराने कमल लक्ष्मण मसूरकर, समाजरत्न पुरस्काराने मधुकर अनंत खरे, विलास किरण काशिद यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास नाभिक महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष बापुराव काशिद, पश्चिम महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष शंकरराव मर्दाने, उपाध्यक्ष भानुदास वास्के, लेखक सुरेशराव गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती आहे. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सातारा शहर वीर जिवाजी नाभिक समाज संघटनेचे अध्यक्ष संतोष साळुंखे व संघटनेने केले आहे.