Breaking News

गुरुकुल मध्ये आरोग्य जनजागृती शिबिर संपन्न


बीड(प्रतिनिधी)- बदललेल्या जीवनशैलीने ह्र्दयविकाराचे प्रमाण वाढत चालले आहे .पण नागरिकांनी घाबरून न जाता ह्र्दयविकाराचा त्रास होणार्‍या रुग्णांवर तात्काळ जागेवरच डॉक्टर्सनी सांगितलेल्या घरगुती उपचार पद्धतीद्वारे होणारा मृत्यु टाळता येवू शकतो असे आवाहन बीड येथील भूलतज्ञ डॉ.मुकुंद पैठणकर व डॉ .प्रशांत काशीकर , डॉ .ख्वाजा एस .एम यांनी केले. गूरूकूल इंग्लीश स्कूल मध्ये आयोजित आरोग्य कार्यशाळे प्रसंगी ते बोलत होते. बीड येथील गूरूकूल स्कूल व सीबीएसई कॉलेजमध्ये आरोग्य जनजागृती शिबिराचे आयोजन शनिवार (दि .१) रोजी करण्यात आले होते . इंडियन असोसिएशन ऑफ अनिस्थिएशन शाखा बीडच्या वतीने सदरील शिबिरात आरोग्य विषयक घ्यावयाची काळजी , दक्षता आणि उपचार पद्धती यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.