Breaking News

कर्मचार्‍यांच्या वेतनात दिरंगाई करणार्‍यांवर कार्यवाही करा-कास्ट्राईब

माजलगाव, (प्रतिनिधी): जिल्हा परीषद अंतर्गत येणार्‍या सर्व कर्मचार्‍यांचे वेतन दर महिण्याला उशीरा होत असल्या कारणाने, कर्मचारी बांधवांना अनेक समस्यांना समोरं जावं लागत आहे. त्यामुळे वेतन अदाईत दिरंगाई करणार्‍या दोषीं बरोबरच,याकामी कार्यरत यंत्रणेवरही कार्यवाही करण्यात येवून,वेतन दर महिण्याच्या एक तारखेला अदा करण्याची मागणी,प्रसिद्धी पत्रकान्वये कास्ट्राइब संघटनेने केली आहे.

महिण्याच्या एक तारखेलाच सर्व जिल्हा परीषद कर्मचारी,निवृत कर्मचारी यांचे वेतन अदा करण्याच्या स्पष्ट लेखी स्वरूपातील सूचना, ग्रामविकास विभागाने यापूर्वीच दि ४ जून २०११ ला परीपत्रकान्वये दिलेल्या आहेत.त्या अनुषंगानेबीम्स प्रणाली शासनाकडून उपलब्थ करून देण्यात आलेली आहे.तिच्यात जर,एक तारखेला वेतन अदाई करण्यासाठी अनुदान अप्राप्त असेल तरीही उणे प्राधीकारपत्राव्दारे वेतन काढण्याची सोय उपलब्ध करुन दिलेली असल्यामुळे,कोणत्याही अडथळ्याविना वेतन अदाई करण्यात यावीच, अशा सुचना ग्रामविकास विभागाच्या क्र.सेवार्थ २०१५/ प्रा क्र२५ / वित्त ६ अ,दि.३१ जूलै २०१५ या परीपत्राद्वारे सर्व जिल्हा परीषदाना दिलेल्या आहेत.तसेच पून्हा या विभागाने दि ५ आक्टो २०१८ ला तशा आशयाचे स्मरणपत्र, सूचना दिलेल्या असतानाही आजपर्यंत कर्मचार्‍यांच्या वेतनात दिरंगाई होत आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांनी घेतलेल्या विविध बँका, सोसायट्या,पतसंस्था, गृहकर्ज यातील व्याजाची रक्कम वाढत आहे. मुलांच्या शिक्षणाबरोबरच परीवारातील अनेक कौटंबीक समस्यांना
त्याला तोंड दयावं लागत असल्यामुळं,तो वैफल्यग्रस्त होत असून, अनेक आजारांना बळी पडत आहे.त्यामुळे शासनाच्या स्पष्ट लेखी परीपत्रकान्वये सूचना असतानाही वेतनात दिरंगाई करणार्‍या सर्व संबधीताच्याकडून कर्मचार्‍यांवर पडणार्‍या व्याजाची रक्कम वसूल करून,त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी व वेतनात पारदर्शकता आणून,एक तारखेलाच वेतन अदाई करण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने अंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेचे, जिल्हा उपाध्यक्ष भारत टाकणखार,जिल्हा कार्याध्यक्ष राहूल टाकणखार, ता.अध्यक्ष वसंत टाकणखार, टअमोल टाकणखार, नितीन पुटवार आदींनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिला आहे.