Breaking News

देवळ्याच्या कल्पेश पगाराची बिहार येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड


देवळा - क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आदेशाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा व यशवंतराव चव्हाण कॅऻलेज कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय मैदानी स्पर्धा दि.१३ते१७ आॅक्टो २०१८या कालावधीत पी.डी.पाटील क्रीडा नगरीत उत्साहि वातावरणात संपन्न होत आहेत.५ किं.मी.चालने या क्रीडा प्रकारात अत्यंत चुरशीच्या लढतीत देवळ्याच्या जि.प.विद्यानिकेतन,देवळा येथील इ.९वी.चा कल्पेश पगाराची बिहार येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली . 
गेल्या ३व४आक्टो.२०१८रोजी विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे संपन्न झालेल्या मैदानी स्पर्धेत १४वर्ष वयोगटातील ११ तर १७वर्ष वयोगटातील २१खेळाडूनी आपला उत्कॄष्ठ सहभाग नोंदविला तसेच दि.६,७,व८ आॅक्टो.जिल्हा क्रीडा संकुल, धुळे येथील मैदानी स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या सुंदर क्रीडा कौशल्याच्या जोरावर कल्पेश पगार व केशव पगाराची कराड येथे होणाऱ्या राज्य स्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली. सदर राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत महाराष्ट्रातील ९विभागातील २००० खेळाडूंनी भाग घेतला यातून देवळ्याच्या कल्पेश पगार या गुणी खेळाडूंची निवड होणे ही अभिमानाची गोष्ट आहे . त्याला मुख्य प्रशिक्षक सुनिल देवरे सर यांचे मार्गदर्शन लाभले.आॅलिंपिक खेळाडू ललिता बाबर, आमदार प्रकाश पाटील, क्रीडा अधिकारी युवराज नाईक, आंतरराष्ट्रीय कोच विजेंद्र सिंग,सुभाष पवार, गजानन पाटील यांनी अभिनंदन केले.