आंबी खालसा गावात चोरट्यांचा धुमाकूळ; लाखोंचा ऐवज लंपास


।संगमनेर/प्रतिनिधी।

तालुक्यातील आंबी खालसा येथे चोरट्यांनी बंद घरे लक्ष्य करत तेथून मोठा ऐवज चोरुन नेल्याची माहिती आहे. जवळपास दहा ठिकाणी घरफोड्या होऊनदेखील घारगाव पोलिस ठाण्यात केवळ एकच तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी अन्य चोऱ्यांचा तपास सुरु केला आहे. मात्र नेमका किती ऐवज चोरी गेला याची माहिती अद्याप उपलब्ध झाली नाही.

घारगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आंबी-खालसा गावातील ही घटना मंगळवारी दि. ९ सकाळी उघडकीस आली. आंबी खालसा येथील मच्छिंद्र भागुजी कहाणे यांनी यासंदर्भात तक्रार दिली. कहाणे यांच्याशिवाय गावठाण परिसरातील सादिक नासिर पठाण, बानूबी महंमद सय्यद, शांताराम रामभाऊ घाटकर, दशरथ हरिभाऊ घाटकर, बाळासाहेब संतू कदम, शशिकांत दादू कदम, माणिकराव ढमढेरे, दादापाटील ढमढेरे, बबन ढमढेरे यांच्या घरांची चोरट्यांनी कड्या-कुलूपे तोडून लाखोंचा ऐवज चोरून नेला. 

मच्छिंद्र कहाणे यांच्या बंद घरासमोरील एक दुचाकी, घरातील रोकड, दागिने असा एकूण सुमारे २ लाख ३९ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेल्याचे उघडकीस पुढे आले. तर अन्य ठिकाणच्या चोऱ्यांचा तपशील समजू शकला नाही. काही जणांकडे केवळ चोरीचा प्रयत्न झाल्याने त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली नाही. पोलीस निरीक्षक अंबादास भुसारी, उपनिरीक्षक योगेश मोहिते यांनी गावात जाऊन चोरीसंदर्भातील माहिती घेतली. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget