Breaking News

आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक संस्थाचे योगदान-डॉ.अशोक थोरात


बीड दि.२२ (प्रतिनिधी)ः- शहरी व ग्रामीण भागातील सर्व सामान्य रूग्णांना विविध शिबीराच्या माध्यमातून दर्जेदार आणि आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक संस्था, संघटनाचे मोठे योगदान असून आरोग्य शिबीराच्या माध्यमातून रूग्णांचे दु:ख कमी करण्याबरोगर रूग्णांना समाधान देण्याचा वसा सामाजिक संस्था सातत्यपुर्वक चालवित असल्याचे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.अशोक थोरात यांनी केले.

रविवारी येथील विवेकांनद हॉस्पिटल येथे जर्मन फाऊडेशन मुंबई या सेवाभावी संस्थेच्या पुढाकारातून रोटरी क्लब,बीड, आदित्य डेटल कॉलेज,बीड., जिल्हा रूग्णालय,बीड व विवेकानंद हॉस्पीटल बीडच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवशीय दुभंगलेले ओठ व टाळु, नाक, कान यासह विविध आजारावरील २५०- ३०० रूग्णांवर तपासणी व २३ रूग्णांवर शस्त्रक्रीया करण्यात आल्या. शनिवारी झालेल्या तपासणी शिबीरात तज्ञ डॉक्टरांनी अनेक रूग्णांची तपासणी केली तर रविवारी आवश्यक असलेल्या रूग्णांवर प्लॅस्टीक सर्जरी करण्यात आली. या शिबीरात जन्मजात दुभंगलेले ओठ व टाळु, नाक, कान याबरील बाह्य विकृती चेहर्यावरील बाह्य विकृती ईत्यादी सारख्या व्यंगावर सर्जन डॉ.रंगनाथ झावर मुंबई, प्लॅस्टीक सर्जन डॉ.नितीन घाग, डॉ.र्हदयरोग तज्ञ डॉ. रोहीत तोष्णीवाल, डॉ.संदीप येवले, बालरोग तज्ञ डॉ.सचिन जेथलिया, डॉ.राहूल सारडा, डॉ.पी.सी.तांबडे, जनरल सर्जन डॉ.प्रभाकर धायतडक, सर्जन डॉ.संकेत बाहेती, डेंटल सर्जन डॉ.स्नेहल झावर, डॉ.पेनी मॅडम, डॉ.श्रीकांत केदार, भुलतज्ञ डॉ.शशिकांत ठोंबरे आदिसह तज्ञ डॉक्टर्स व त्यांचे सहकारी रोटरी क्लब बीडचे अध्यक्ष डॉ. प्रशांत देशपांडे, सचिव रो.सुहास जोशी , आदित्य डेंटल कॉलेज,बीड., जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी.पवार, अति.जि. शल्य चिकीत्सक डॉ.सुखदेव राठोड, आर.एम.ओ. डॉ. एस.एल.हरिदास, शिबीर प्रमुख लॉ.विष्णूदास बियाणी, रो.डॉ.ऍड.राजेंद्र सारडा, रो.डॉ.रोहीत तोष्णीवाल, प्रकल्प सभापती रो.सुरज लाहोटी .

या शिबीरात विवेकानंद हॉस्पीटल , आदित्य डेंटल कॉलेज , शेषनारायण हाटवटे , जिल्हा रूग्णालय रमेश तांगडे, रो.राम मोटवानी , प्रकाश कुलकर्णी , सहा प्रशा. अधिकारी सुरेंद्र बारगजे , कनिष्ठ प्रशा.अधिकारी शिवलाल राठोड, वसंतराव डावकर , दादासाहेब डावकर, डॉ.बी.जी.झंवर , डॉ.तुषार श्रृगारपुरे आदिसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना डॉ.थोरात म्हणाले की रूग्णांना होणार्या वेदना कमी करण्यासाठी डॉक्टर्स प्रयत्नशिल असतात. मोठ मोठ्या शहरातील डॉक्टर्सना रूग्ण सेवेसाठी शहरात बोलावून सर्व सामान्य रूग्णांच्या चेहर्यावर हसू खूलविण्याचे समाधान येथील सामाजिक संस्थोनी केले असून भविष्यातही हा उपक्रम व्यापक प्रमाणात व्हावा अशी अपेक्षा असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी बोलतांना डॉ.रंगनाथ झावर म्हणाले की शनिवारी झालेल्या तपासणी शिबीरात अनेक रूग्णांवर तपासणी करण्यात आली. यातील आवश्यक असलेल्या रूग्णांवर बीड येथे शस्त्रक्रीया करण्यात आल्या.